आयुष्यात प्रत्येक वळणावर पडणारा प्रश्न म्हणजे, ‘आता पुढे काय?..’ या प्रश्नाची बरीच उत्तरं आज आपल्यासमोर आहेत. पूर्वीपेक्षा आता करिअरच्या अनेक वाटा आपल्यासमोर आहेत. “चित्रकला” हा त्यातलाच एक सुंदर पर्याय... या कलेशी निगडीत खूप काही करण्याजोगं आहे. अभाव आहे तो फक्त मार्गदर्शनाचा... हा अभाव दूर करण्याच्या हेतूने मी हे क्षेत्र निवडलं ज्यात मला स्वत:ला समाधान मिळतं. जे विद्यार्थी चित्रकला क्षेत्रात करिअर करू इच्छितात त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आज मी करत आहे. मला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती आणि म्हणूनच दहावीनंतर जिद्दीने मी सर. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये ऍडमिशन घेतली. फाईन आर्ट केलं. त्यानंतर रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून कमर्शियल केलं. तरी कलेची भूख भागेना आणि म्हणून नामांकित संस्थेमधून फॅशन आणि ज्वेलरी डिझाईन पण केलं. अशा नानाविध कोर्सेसमधून चित्रकलेच्या अनेक अंगांशी ओळख करून घेतली. आयुष्यातील जवळ – जवळ दहा वर्ष शिक्षणासाठी खर्ची पडली आणि तेव्हा कुठे मला विद्यार्थी घडवायचं क्षेत्रं मिळालं. चित्रकलेत असणाऱ्या संधींचा वापर येणाऱ्या पिढीला व्हावा याच हेतूने 20 वर्षांपूर्वी मी स्वत:ची छोटीशी कला संस्था सुरू केली
“प्रज्ञा’ज् डिझाईन अकॅडमी”
या संस्थेच्यानिमित्ताने एक छोटंसं रोप लावलं होतं. या रोपाचा आज वृक्ष झाला आहे.
चित्रकलेवर आधारीत अनेक क्षेत्र आहेत. खूप कमी लोकं याबद्दल जाणतात. BFA, ARCHITECTURE, PRODUCT, TRANSPORTATION, FASHION, ANIMATION, VIDEO GAME DESIGN हे त्यातलेच काही पर्याय...या आणि अशा अनेक कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळतो. या क्षेत्रात नाव तर होतंच त्याबरोबर चांगली अर्थप्राप्ती ही होते. करिअर करण्यासाठी चा एक सुंदर पर्याय ज्यात मार्गदर्शनाचा अभाव आहे आणि म्हणूनच मी या क्षेत्रात जनजागृती करायचे ठरवले. अर्थात या क्षेत्रात करिअर करणं तितकं सोपं ही नाही... विद्यार्थ्यांच्या सर्व कलागुणांचा कस यात लावला जातो. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा असतात. त्यांची पूर्वतयारी किमान दोन वर्ष आधीपासून करावी लागते. त्यांना त्यांचा पोर्टफोलीओ तयार करावा लागतो. तयारी चांगली झाली असेल तर त्याचा उपयोग परदेशात करिअर करण्यासाठीसुध्दा होतो. म्हणूनच आम्ही अगदी वैयक्तिक पातळीवर येत चित्रकलेवर शास्त्रोक्त पध्दतीने संस्कार करतो, अशा प्रकारे त्यांना घडवतो की जेणेकरून माझे विद्यार्थी हल्लीच्या स्पर्धा युगात कुठेही मागे राहणार नाहीत. त्यांच्या प्रवेश परीक्षांची पूर्ण तयारी करून घेतो.
कलेचा प्रसार हेच माझे ध्येय बनले. अनेक शहरातून या विषयावर शिबिरे घेतली. तरी तळागळापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. म्हणून चित्रकलेवर आधारित असणाऱ्या सर्व स्पर्धा परिक्षा जसे NID, NIFT, CEED, NATA इ. चे ऑनलाईन कोर्स अत्यंत उपयोगी ठरले. आज अनेक विद्यार्थी याचा फायदा घेत आहेत. एकदाच तुम्ही www.pradnyas.com या वेबसाईट वर फेरफटका मारलात तर निश्चित तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील.