रसिकांनी अनुभवली कलाविष्कारांची त्रिवेणी

प्रसाद फणसे आणि नवरस आर्ट अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित त्रिवेणी हा कार्यक्रम नुकताच रविंद्र नाट्यमंदिर येथील मिनी थिएटरमध्ये संपन्न झाला. कोजागिरी पौर्णिमेचा योग साधून हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रसाद फणसे या सांगीतिक कार्यक्रमाचे संयोजक होते.
या कार्यक्रमात रसिकांनी नाट्यसंगीत, लावणी, अभंग असा अनोखा संगम अनुभवला. मूळ रचना ऐकवत त्या अनुषंगाने धनश्री लेले ह्यांनी प्रत्येक संगीतप्रकाराचे अभ्यासपूर्ण व रसाळ विवेचन केले. राधिका फणसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या तिन्ही प्रकारच्या गीतांवर बहारदार नृत्ये सादर केली. या सर्व कलाविष्कारांनी सर्वच रसिकांची मने जिंकली. एक चांगला सांगीतिक व चांगली संकल्पना असलेला कार्यक्रम रसिकांसाठी मनोरंजनाची पर्वणीच ठरला.

Subscribe to receive free email updates:

Related Posts :