कलर्स मराठीवर ड्रोन कॅमेराचा “चाहूल” मालिकेच्या प्रोमोद्वारे पहिल्यांदा वापर !
मुंबई २ डिसेंबर २०१६ : आजकल टेलीव्हीजनवर वेगवेगळ्या पद्धती वापरून शुटिंग केले जाते. मालिकेला मनोरंजक आणि आकर्षक करण्यासाठी बऱ्याच प्रकारची तंत्र वापरली जातात, ज्याद्वारे चित्रिकरणामध्ये नाविन्यता आणली जाते. अश्याप्रकारच काहीस कलर्स मराठीने या वेळेस केले आहे. कलर्स मराठीवरील चाहूल मालिकेचे प्रोमोज सध्या लोकांच्या पसंतीस आले आहेत तसेच प्रोमोजबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा देखील होत आहे. प्रोमोजमधून मालिकेबद्दलची आणि कथानकामध्ये काय असेल याबद्दलची उत्सुकता अजूनच वाढली आहे. या प्रोमोजमध्ये पहिल्यांदा कलर्स मराठीने ड्रोन कॅमेराचा वापर केला आहे.
तेंव्हा बघायला विसरू नका चाहूल १२ डिसेंबर पासून रात्री १०.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.